Press "Enter" to skip to content

गोल्डी ची “ती बांग” अखेरची ठरली

शेकाप युवानेते बबन विश्वकर्मा यांना प्राणप्रिय असणाऱ्या कोंबड्यावर विषप्रयोग ?

पशु निर्दयीपणा कायदा 1960 अन्वये कारवाई करण्याची मागणी

सिटी बेल | पनवेल |

आपल्या लाडक्या गोल्डी सोबत बबन विश्वकर्मा

शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे युवा नेते बबन विश्वकर्मा यांना प्राणप्रिय असणाऱ्या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये त्यांनी गेले नऊ महिन्यापासून जिवापाड सांभाळलेल्या गावठी कोंबड्या चा मृत्यू झाला आहे.

गोल्डीच्या खणखणीत आवाजात बांग ऐकल्यावरती नेहमी बबन विश्वकर्मा यांना जाग येत असे. त्या दिवशी देखील अशीच बांग ऐकल्यानंतर बबन विश्वकर्मा पहाटे उठून आपल्या नित्यक्रमास लागले. काही तासानंतर त्यांना गोल्डी च्या हालचालीचा अंदाज येत नसल्याचे पाहून त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शोधाशोध करत असतानाच त्यांना गोल्डी गतप्राण होऊन पडल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणात त्या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याचा त्यांना दाट संशय आहे.

हे प्रकरण आपण पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स अर्थात पेटा या संस्थेकडे घेऊन जाणार असल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले.पशु निर्दयीपणा कायदा 1960 अन्वये कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.




Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.