सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मागील दिडवर्षांपासून देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मध्यंतरी कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाले होते परंतु पुन्हा कोरोना महामारीचा कोविड टु डबल म्युटेशन नावाचा नवीन ट्रेंड आल्याने पुर्वीपेक्षा अधिक नागरिक बाधित होवून अनेक नागरिकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला.पर्यांवरणात ऑक्सिजन वाढत रहावा.यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधव आणि कानसा वारणा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचशेपेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा गणपत पाटील आणि पत्रकार बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड सुरू आहे.वावर्ले येथे विविध जातींच्या जवलपास पाचशेपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी आवला,जाम,चिंच,आंबा, कडुनिंब, फणस तसेच आरोग्यदायी वृक्ष आदी जातीचे वृक्ष मालरानावर लावून त्यांचे देखभालीची जबाबदारी स्विकारण्यात आली. पर्यावरणात ऑक्सिजन वाढावे यासाठी हि वृक्षलागवड करण्यात आली.
ऑक्सिजनचे महत्व आपण शाळेत विज्ञानात शिकलो.पण त्याचे खरे महत्त्व कोरोनाने शिकविले आहे.वृक्षलागवड केल्याने वातावरणात ऑक्सिजन पातळी वाढेल.यासाठी सर्वांनी वृक्षलागवड करावी असे आवाहन कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा पाटील यांनी केले आहे.
यावेळी पत्रकार राकेश खराडे, पत्रकार अर्जुन कदम, पत्रकार अमोल सांगले, पत्रकार गौतम सोनावणे,जगदीश दगडे, पंढरीनाथ कुरंगले, कोल्हे आदी उपस्थित होते.








Be First to Comment