Press "Enter" to skip to content

अबोली रिक्षा चालक महिलेला मारहाण प्रकरण तापले

भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची वाशी हॉस्पिटलमध्ये भेट

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

अबोली रिक्षा चालक महिलेच्या मारहाण प्रकरणी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जावून त्यांची भेट घेतली. तसेच सत्य परिस्थिती जाणून घेतली.

मंगळवारी रात्री अबोली रिक्षाचालक संघटनेची सविता बेले या बेलापूर ते नेरूर सेक्टर 10 येथे प्रवाशाच्या जबरी मुळे 4 प्रवाशी घेऊन घेली असता मीटर प्रमाणे भाडे 75 रुपये झाले असता अज्ञात प्रवाशाने तिच्याबरोबर हुज्जत घालून हिला मारहाण केली ती सध्या वाशी सेक्टर10 च्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून सदर प्रकरणाची माहिती अबोली रिक्षाचालक संघटनेच्या अध्यक्ष संतोष भगत यांना मिळताच ते ताबडतोब मदतीला धाऊन गेले महिलेची प्रवाश्यांना विरोधात पोलीस तक्रार नेरूर च्या पोलीस ठाण्यात नोंद केली या महिलेवर झालेला मारहाणीत तिला न्याय मिळालाच पाहिजे अशी अबोली रिक्षा चालक महिला संघटनेची मागणी आहे.

सदर घटना भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना समजता त्यांनी वाशी सेक्टर 10 च्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भेट घेतली असता वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांच्याशी चर्चा केली असता असे समजले की तिची प्रकृती स्थिर आहे तिची कोरोना टेस्ट केली असता पॉझिटीव्ह आली असल्यामुळे तिला कोरोना सेंटरला हलवण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. चित्रा वाघ यांनी पोलीस अधिकार्‍यांना या बाबत फोन करून विचाले असता यातील 3 आरोपी ताब्यात घेतले असून 1 लवकरच ताब्यात घेऊ असे त्यांना सांगितले.

यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या अबोली महिलांच्या पाठीशी मी नेहमी असे या महिलेस न्यास नक्की मिळून देऊ, या पुढे असे कोणा महिलेवर मार-हाण होऊ नये यासाठी प्रयत्न करेन तसेच आरोपीला शिक्षा देऊन तिला न्याय मिळवून देऊ. या वेळी माजी खासदार संजीव नाईक सुधा उपस्थित होते त्यांनी ही या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही अबोली रिक्षा महिलांना बरोबर आहे असे सांगितले सर्व अबोली महिलांनी चित्रा वाघ, संजीव नाईक, अध्यक्ष संतोष भगतचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.