सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खालापूर तालुक्यातील पौष्टिक तृणधान्य नाचणी हे पिक यांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी,शिवाय पिक दर्जेदार यावे यासाठी जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना या लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ३६ किलो बियाणे २९ शेतकरी वर्गांस वाटप केले.
पुर्वी नाचणी हे पिक मोठ्याप्रमाणावर लागवड केली जात होती. मात्र हळूहळू हे पिक लोप पावत असतांना खालापूर तालुक्यात नाचणी हे पिक वाढले या उद्दात विचारांतून या ठिकाणी ६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत आहे.
आपण शेतकरी वर्गांस बियाणे देण्यात आले असून त्यांची पाहणी आणी लागवड किती झाली हे पाहण्यासाठी खालापूर तालुका कृषी अधिकारी यांची टिम पाहणी करण्यासाठी दाखल झाली.यावेळी तयार झालेले नाचणीची रोप लागवड करण्यास व्यस्त असलेले दृश्य या ठिकाणी पहावयास मिळाले. भात शेती समवेत,नाचणी तसेच विविध प्रकारचे कंदमुळे सुद्धा लागवड करण्यासाठी सहकार्य करीत आहे.
शेती ही टिकली पाहिजे या दृष्टीकोणातुन कृषी अधिकारी सातत्याने शेतकरी वर्गांची भेट घेवून त्यांस प्रोत्साहीत करीत आहे.शेतकऱ्यांस शेती करण्यासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून मदत केली जाईल मात्र शेतकरी बांधवांनी शेतीतून दर्जेदार पिके घेतली पाहिजे.यासाठी ग्रामपंचायत सरपंच, भगवान वाघमारे,उप सरपंच स्नेहा मरागजे तसेच ग्रामसेवक प्रमोद पाटील कृषी सहायक -आर बी आंधळे,आत्मा बी.टीएम. प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थित हे कार्यक्रम राबविण्यात आले होते.
यावेळी या परिसरातील ग्रामस्थ,खालापूर शेतकरी संघटना अध्यक्ष,तथा सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड – सुभाष मुंढे अदि उपस्थित होते.








Be First to Comment