Press "Enter" to skip to content

अचानक सकाळी घरात शिरला साप..वाचा मग काय झाले पुढे..

सिटी बेल | पनवेल |

पनवेलमध्ये बावन बंगला, किनारा सोसायटी येथे राहत असलेल्या जितेश फुलवाणी यांच्या घरी सकाळी अचानक बाहेरुन धामण नावाचा साप आल्यामुळे त्यांच्या घरातील सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली.

अशा वेळी काय करावे काय नाही हे त्यांना समजत नव्हते त्यावेळी त्यांनी नगरसेवक राजु सोनी यांना फोन करून घरात साप शिरल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना सांगितले ते लगेचच फुलवणी यांच्या घरी सर्प मित्र विक्रांत काळे यांना घेऊन गेले व सुरक्षित रीत्या सापाला पकडून बंदर रोड वरील खाडीत सोडले.

नगरसेवक राजू सोनी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे फुलवणी कुटुंबियांनी त्यांचे व त्यांच्या स्वीय सहाय्यक मंदार देसाई व सर्प मित्र विक्रांत काळे यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.