Press "Enter" to skip to content

विहुर नदीवरील पुल बनला धोकादायक ! एस टी वाहतूक बंद

अलिबाग मुरुड रस्त्यावरील एस टी वाहतूक बंद, खबरदारीसाठी वाहनांची एकेरी वाहतूक

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुरुड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे छोट्यामोठ्या सर्वच नदी नाल्यांना आलेल्या प्रचंड पुराचे पाणी त्यावरुन ओसंडून वाहुन गेल्यामुळे आधीच कमकुवत असलेले पुल आता अधिकच धोकादायक बनले आहेत. मुरुड-आलिबाग या मुख्य रस्त्यावरील विहुर या गावानजिकच्या नदीवरील पुलही आता अधिकच धोकादायक बनला आहे.त्या मुळे एस टी बस वाहतूक बंद आहे.

सदर पुलाच्या मातीचा भराव पाण्याने वाहून गेला असून त्याला मोठे भगदाड पडले आहे.मुरुडमध्ये कमी प्रमाणात असला तरी अजुनही पाऊस सुरुच आहे त्यामुळे डोंगरातून येणार्या पाण्याच्या प्रवाहाने हा भराव अजुनही वाहून जाऊ शकतो खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते स्थानिक प्रशासनाने तेथे दगड लावून एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे.

काशीद पुलाचे ऑडिट झाले होते आणि 10 वर्षे काहीच होणार नाही असा रिपोर्ट सा बा विभाकडून दिला होता. तरीही पूल कोसळण्याची घटना घडली.आता रेवदंडा ते साळाव या मुख्य पुलाकडे लक्ष ठेवावे लागेल. कारण या पुलावरून त्क्षमतेपेक्षाही खुप मोठ्या वजनाची वाहनांची वाहतूक सुरू असते.तेलवडे ते शिघ्रे दरम्यान देखिल एक ठिकाणी रस्ता खचल्यानें दगड लावण्यात आले आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.