चाईल्ड लाईनच्या माध्यमातून “स्वप्नालय” जान फाउंडेशनने दिले पूर्वाच्या स्वप्नांना पंख
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
आठ वर्षाची पूर्वा राहुल देवकुळे खोपोली शहरातील,शांतीनगरमध्ये वास्तव्यास होती.काही काळापूर्वी वडीलांचे छत्र हिरावले होते.त्यामुळे पूर्वासह तीच्या आईचा संसार उघड्यावर आला होता.त्यातच वडीलांच्या जाण्याने आईचे डोक्यावर परीणाम झाला होता.
संकटे सांगून येत नसतात तशी एकामागून एक येत गेली.
आठ वर्षाच्या चिमुकलीसाठी आता आभाळ फाटले होते .जगायच कस हा प्रश्न उभा ठाकला होता .लहान वयात काय नोकरी करणार,आईला कोण सांभाळणार ही व्याकुळता झोपू देत नव्हती परंतू “देव तारी त्याला कोण मारी” तो विश्वाचा पालक एका फोन कॉलचे माध्यमातून धावून आला होता.कोणीतरी चाईल्ड लाईन या संस्थेला कटल करून या अभाग्या मुलीची व्यथा मांडलीआणि वेळ न दवडता चाईल्ड लाईनचे जगदिश दगडे,रेखा भालेराव पूर्वाचे घरी पोहचले.ती आठ वर्षाची चिमुरडी आणि तीची माय विषण्ण अवस्थेत बसल्या होत्या.त्यांचा जगण्याचा आधार संपला होता.

शून्याकडे नजर लावून बसलेल्या त्या अभाग्या पूर्वाचा चेहरा बरच काही सांगून जात होता.जगदिश दगडे,रेखा भालेराव यांचेसाठी तो प्रसंग अंगावर शहारे आणणारा ठरला.खरतर असा प्रसंग स्त्री जातीसाठी व्यवस्थेचे डांगोरे पिटणा-यांसाठी डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा होता.जगण्यासाठी अन्न,रहाण्यासाठी घर आणि परीधान करण्यासाठी नीट कपडेही असू नयेत ? भ्रष्टाचार करून आपल्या आया-बहीणींना पोसणा-या व्यवस्थेसाठी आणि गळा काढून स्त्री जातीवर भाषणे देणा-या राजकारण्यांसाठी जागेवरच शाप मिळावा अशी ही वेदनामय परीस्थिती परंतू चाईल्ड लाईनने जान फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्वाच्या पखांना बळ देण्याचे काम केले आहे.
आता प्रश्न आहे तो त्या मातेचा , मनोरूग्ण असलेल्या या मातेला आधार कार्ड प्रमाणे कोणी आधार देईल तर नक्कीच परमेश्वरही मदत करणा-यांचा कधीतरी आधार ठरेल असे मत चाईंल्ड लाईंनचे पदाधिकारी जगदिश दगडे यांनी व्यक्त केले आहे.
अपघातग्रस्त ग्रुपचे प्रमुख गुरूनाथ साठेलकर यांनीही या प्रसंगी मोलाची मदत केल्याने चाईल्डलाईनसह गुरूनाथजी यांचेही कौतुक या परीसरात होताना दिसत आहे.








Be First to Comment