शासनाने दादासाहेब गायकवाड आणि बिरसा मुंडा योजना तात्काळ सुरू कराव्यात — गोपालराव तंतरपाळे
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
महाराष्ट्रातील गोरगरीब व आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी असणारी शासनाची सामाजिक न्याय विभागातील पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि आदिवासींची बिरसा मुंडा सबलीकरण स्वाभीमान योजना या दोन्ही योजना तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या माध्यमातून सुरु झाल्या सन 2012 पर्यंत ही योजना सुरू होत्या मात्र मागील अनेक वर्षांपासून सदर दोन्ही योजना रखडलेली असल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, आदिवासी, भुमीहीन यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे या योजना सुरू होण्याकरीता मंत्रालयात अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी येत्या 16 जुलै 2021 रोजी महाड येथील क्रांतीभुमी मध्ये प्राणांतिक उपोषण होणार असल्याचे भिमशक्ती संघटनेचे सरचिटणीस तथा छावणी परिषद देहूरोडचे सदस्य गोपाळराव तंतरपाळे यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की आमचा लढा अनेेेक वर्षापासून शासन दरबारी सुरू असून शेवटच्या घटकांपर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार आहे.महाराष्ट्रातील भुमिहीन शेतकरी, आदिवासी लाभार्थ्यांना सदर योजनेच्या माध्यमातून बागायती आणि जिरायती अश्या जमिनी देण्याचा शासन आदेश असताना सुद्धा यावर अजूनपर्यंत संबंधित मंत्री, अधिकारीवर्ग लक्ष देत नसल्याने या सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन छेडण्यात येत आहे सदर आंदोलनात कोरोनाचे नियम पाळण्यात येणार असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.तेव्हा शासनाने अशा गोरगरीब जनतेचे अंत न पाहता तातडीने आदेश जारी करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होऊन आत्मदहन करण्यात येणार असल्याचे तंतरपाळे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रचारक उमेश लांगी, राजु गोडबोले, डॉ. दिपक कांबळे, अरुण भोजने, निलेश मोरे, लक्ष्मण निरगुडा, अमृता वाघमारे, यशोधरा गोडबोले आदिंसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment