Press "Enter" to skip to content

अतिवृष्टीमुळे उरण शहरात पावसामुळे अनेकांच्या घरात शिरले पाणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे व शहरातील नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने अनेकांच्या घरांना पाणी घुसून समानांचे नुकसान झाले आहे.
काल दुपारपासून पावसाने जोर धरला होता. त्यात रात्रभर पाऊस जोराने पडत असल्याकारणाने व नाले जाम झाल्याने शहरातील इमारतीमधील पहिल्या मजल्यात व बैठ्या घरात पाणी घुसण्यास मध्यरात्री सुरुवात झाली. त्यामुळे काहींना मध्यरात्रीपासूनच रात्र जागून काढण्याची वेळ आली. घरांना पाणी घुसल्याने घरातील समानांचे नुकसान झाले असल्याचे छायाचित्रावरून दिसून येते.

एक दिवसाचा पावसाने हे हाल होत असतील तर पावसाळा जाईपर्यंत एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील पावसाळ्यात ही अवस्था नेहमीच होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर परप्रतियांनी अतिक्रमण केल्याने व काहींनी भराव करून उंचवटा निर्माण केल्याने जुनी घर खाली गेली आहेत.

त्यामुळे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने हे पाणी खाली घरे आहेत त्यांच्या घरांना जात आहे. तरी नगरपालिकेने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी नालेसफाई व पाण्याचा मार्ग याची त्वरित सोय करावी जेणेकरून पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या घरांना तरी पाणी जाणार याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.