Press "Enter" to skip to content

शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी दिले रविशेठ पाटील यांना स्वप्रकाशित पुस्तक भेट

सिटी बेल | नवी मुंबई |

सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी लिहिलेले “जय शिवराय” हे पुस्तक श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांना मंगळवार दिनांक १३ जुलै रोजी भेट दिले.देशमुख यांनी या पुस्तकाची भेट नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांना देखील दिली.

सदर पुस्तकाला मुंबई पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी प्रस्तावना लिहिली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी २६/११ च्या ताज हॉटेलच्या हल्ल्यावेळी दाखवलेली तत्परता व निडरता हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील असलेली निष्ठा त्यांनी घातलेला आदर्श हे या प्रस्तावनेतून दिसून येते.या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया रवीशेठ पाटील यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की,पुस्तक वाचल्यानंतर युद्ध संपलं, वैर संपलं या पान क्रमांक ९८ वरील अफझल खानावरील मथळ्यातील शेवटचा मजकूर मला खूप आवडला ज्यात लिहिले आहे की,
“राज्य येतात आणि जातात, राजे येतात आणि जातात लक्षात राहते ते तुमचे आचरण..”

देशमुख यांच्या “जय शिवराय” या पुस्तकास माझ्या वतीने व श्री, साई देवस्थान, साईनगर, वहाळच्या वतीने भरभरून शुभेच्छा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.