वीज वितरण कंपनीचे गोकुळ सोनावणे यांचे मोठे सहकार्य
सिटी बेल | तळोजा | प्रतिनिधी |
सिडको महागृहनिर्मितीतील लाभार्थीना गुरुवारी ( १ जुलै) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रत्यक्षात ताबा मिळाल्याने त्यांच्या आयुष्यातील पहिल्या घरांचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अनेकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण महत्वाचे म्हणजे या घराना वीज पुरवठा घेण्यासाठी 10 हजार रुपये मोजावे लागणार होते ते शिवसेनेचे महेश गुरव ,राहुल जगधने यांच्या प्रयत्नातून व कळंबोली महावितरणचे सहाय्यक अभियंता गोकुळ सोनावणे यांच्या सहकार्याने ते आता 2250/- रुपये भरावे लागणार आहेत त्यामुळे लाभार्थीनी आनंद व्यक्त करत शिवसेना पदाधिका-यांचे आभार मानले.
सिडकोने कळंबोली येथील गृहसंकुलातील घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली असून दिवसाला १०० घरांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या घरांचा ताबा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मिळणार होता, पण करोनामुळे ही ताबा प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यावेळी सिडकोने एक जुलैपासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने दिला जाईल असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केले होते.सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत सिडको सध्या हजारो घरे बांधत आहे. त्यातील २५ हजार घरांचे तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, आणि द्रेणागिरी या सिडको नोडमध्ये बांधकाम सुरू आहे. दोन वषार्र्पूर्वी सिडकोने १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. त्यातील चार हजार घरांचा ताबा हा ऑक्टोबर २०२० मध्ये दिला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते, पण करोनामुळे ते पाळता आले नाही. या काळात सिडकोने पाच हजार घरांची पूर्ण रक्कम स्वीकारली होती. त्या लाभार्थीना दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याने लाभार्थीमध्ये तीव्र नाराजी वाढत होती. सिडकोने या काळात दंडात्मक रक्कम माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता, तरीही हजारो ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरल्याने बँक हप्ते व भाडे असे दोन्ही खर्च सोसत होते.
गेल्या वर्षी करोनामुळे ऑक्टोबरमध्ये घरांचा ताबा देण्यात न आल्याने सिडकोने नंतर एक दोन आणखी मुदती दिल्या, त्याही कामगार समस्या आणि टाळेबंदीमुळे शक्य झाले नाही. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी यासाठी एक विहित कालावधी कार्यक्रम आखून एक जुलैपासून घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली. घराची सर्व रक्कम व देखभाल खर्च भरणारे तीन हजार ग्राहक सध्या आहेत. त्यांना गुरुवारपासून ताबा देण्यास सुरुवात झाली असून कळंबोलीतील लाभार्थीपासून प्रारंभ झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ११ लाभार्थीना सदनिकांचा ताबा देण्यात आला. पण येथील १०१७ घरांसाठी लागणारा वीज पुरवठा यासाठी १० हजार रुपये अदा करायचं होते ते या लाभार्थीना कोरोनाच्या महामारीत परवडणारे नसल्याने त्यांनी शिवसेनेचे महेश गुरव व राहूल जगदाने यांना विनंती केली असता त्यांनी राज्याच्या मंत्रीमहोद्यायांसी बोलून कोरोनाच्या महामारीत रहिवासी एवढे पैसे भरणे शक्य नसल्याने ते कमी करण्यात यावे अशी विनंती केली होती ती मान्य करून त्यात मोठ्या प्रमाणात कमी करून ती २२५०/ रुपये करण्यात आले आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीचे गोकुळ सोनावणे यांची मोठे सहकार्य मिळाले.
त्यामुळे लाभार्थीनी आनंद व्यक्त करत वितरण कंपनीचे गोकुळ सोनवणे, शिवसेनेचे महेश गुरव, राहुल जगधने, श्री माने, श्री पवार , श्री पाटील श्री हिंगणे, श्री यमगर, श्री गणेश यादव यांचे अभिनंदन केले.








Be First to Comment