कर्जत रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे रद्द केलेले थांबे पुन्हा सुरु करा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत रेल्वे स्थानकावर असलेले एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करू नका व रद्द केलेले थांबे त्वरित सूरु करावेत. ज्या गाड्यांचे थांबे कर्जत रेल्वे स्थानकावर नाहीत. त्याचेही थांबे कर्जत ला देण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन पंकज ओसवाल यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.
गेल्या वर्षी पासून कोरोनामुळे पूर्ण भारतातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. काही काळानंतर हळू हळू काही गाड्या सुरुवात करण्यात आल्या. मात्र त्या गाड्या विशेष गाड्या म्हणून सुरू करण्यात आल्या परंतु कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वी असलेले अनेक एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द केले. असे केल्या असल्याने कर्जतकर प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याने त्याचा फायदा फक्त कर्जत तालुका पुरताच मर्यादित न रहता त्याचा फायदा भिवपुरी ते कल्याण, खोपोली, रसायनी व इतर बऱ्याच ठिकाणच्या प्रवाशांना होणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यानी खासदार बारणे यांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा केली आणि निवेदन दिले.
या बाबतीत आपण रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून तसेच रेल्वे मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून कर्जतच्या प्रवाशांच्या समस्या दूर करण्यात अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे यांना केली आहे. तसेच कर्जतकरांचे रेल्वे बाबतचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी विनंती ही शेवटी पंकज ओसवाल यांनी खासदार बारणे यांच्याकडे केली.








Be First to Comment