विभागातील विकास कामे टप्प्या टप्प्याने मार्गी लावली जातील : आ.अनिकेत तटकरे
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी ग्रामपंचायतीच्यावतीने आंबा,नारळ झाडांची लागवड केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर कल्पवृक्ष लागवड होत असताना त्याची निगा योग्यरीत्या राखणे ही आपली जबाबदारी असून खतांचे नियोजन सुध्दा करणे आवश्यक आहे. वाशी ग्रामपंचायतीच्यावतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.त्याकाळी द.ग.तटकरे व भाईसाहेब पाशिलकर यांनी या भागाचा दुरदृष्टी ठेवून विकास साधल्याने या भागाचा चांगले विकास झाला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक विकास कामे करण्याची मागणी करण्यात आली आहेत.ही विकास कामे टप्प्या टप्प्याने मार्गी लावली जातील.यासह पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लावण्यात येईल.धाटाव औधोगिक क्षेत्रात भुमिपुत्राना न्याय देण्याची भुमिका आपण घेणार असल्याचे आ.अनिकेत तटकरे यांनी खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित वृक्षारोपण व ग्रामस्थांना आंबा व नारळ झाडांच्या वितरण प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, जेष्ठनेते सुरेश मगर,शंकरराव भगत,माजी उपसभापती,अनिल भगत,अप्पा देशमुख, नगरसेवक महेंद्र गुजर,अहमद दर्जी,अन्सुल कंपनीचे अधिकारी शिरीष सातपुते,गिरीश हिरवे, किशोर तावडे, सरपंच वंदना वारगुडा,उपसरपंच अरविंद मगर,रामाशेठ म्हात्रे,दत्ता चव्हाण,ज्ञानेश्वर सांळुखे,अनंत मगर,सतिश भगत, ग्रामसेविका अर्चना पाटील,वाशी ग्रा.सदस्य पांडुरंग हंबीर,हरिश्चंद्र मोरे, समिता भगत,दिपाली धामणसे,अंतोष शिर्के, मनाली मगर,समिधा सुतार,रमेश बर्डे,रमेश जोगडे,अनंत जंगम, मनोहर जंगम,राकेश गुरव,अशोक निकम,वैभव घाणेकर,महेश बामुगडे,संदीप मगर, प्रकाश भगत,प्रशांत चितळकर, चंद्रकांत भगत,अशोक भोईर,प्रजोत गुरव,लक्ष्मण रटाटे,नथुराम मगर,लक्ष्मण जंगम,रामचंद्र मगर,परशुराम भगत,विलास भगत आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेश मगर यांनी कोकणाला विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करत रायगडसह कोकणाचा विकास खा.सुनील तटकरे यांनी साधला आहे. महाराष्ट्रभर लोकाभिमुख कामांच्या माध्यमातून खा.सुनील तटकरे यांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आ.अनिकेत तटकरे यांचे चांगले काम चालु असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी अंशुल कंपनीने नारळाची व सुदर्शन कंपनीने आंब्याची झाडे उपलब्ध करून दिली आहेत.हा कार्यक्रम सुरेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच वंदना वारगुडा, उपसरपंच अरविंद मगर यांच्यासह ग्रा.सदस्य, ग्रामस्थ यांनी यशस्वीपणे पार पाडला.








Be First to Comment