Press "Enter" to skip to content

रामदास शेवाळे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली येथील रक्तदान शिबीरात ३०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल | कळंबोली |

शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या वाढदिवसाचे अयैचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूह, शिवसेना-पनवेल, रामदास शेवाळे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर सुधागड शाळा सेक्टर १ कळंबोली आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दिनांक २७ जुलै ला असून त्यांच्या आदेशानुसार राज्यात शिवसंपर्क अभियान राबवत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालीकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिबिराचे आयोजक शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, उपमहानगर प्रमुख दिपक घरत उपमहानगर प्रमुख कैलास पाटील, कळंबोली शहरप्रमुख डी.एन. मिश्रा, युवासेनेचे विधानसभा समन्वयक नितिन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शिवसैनिक योगेश तांडेल, यांच्या सह मोठ्या संख्येने रक्तदाते व शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.