गुळसुंदे हद्दीतील गावांना पाताळगंगा एम.आय.डी.सी.पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळण्याची मागणी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परिसरातील गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली आकुलवाडी, गुळसुंदे या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनची वाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना मागील १० ते १२ वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२ वर्ष जुन्या व नादुरुस्त चावणे पाणी पुरवठा प्रकल्पाद्वारे पाताळगंगा नदीतील दूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविणा पुरवठा केला जातो. तोही आठवड्यातून एक ते दोनवेळा.
याबाबत संबंधित पाणी पुरवठा योजनेचे उप अभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल प.स.च्या गटविकास अधिकारी यांचेकडे वारंवार तोंडी, लेखी तक्रारी करून प्रसंगी मोर्चे काढूनही येथील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नाही या समस्येने ग्रामपंचायतही हतबल झाल्याने पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनाही पत्रव्यवहार केला तरीही आजतागायत मार्ग निघालेला नसल्याने दूषित पाणी पुरवठा करून गुलसुंदे हद्दीतील नागरिकांच्या जीवाशी मांडलेला खेळ तात्काळ थांबवून वरील सर्व गावांसाठी रसायनी येथील पाताळगंगा एम.आय.डी. सी. च्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा ह्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दल संघटनेच्यावतीने राष्ट्र सेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १३/०७/२०२१ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ‘शिवतीर्थ’ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मात्र सदर मोर्चादरम्यान कोरोना संसर्ग वा इतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी असे संतोष ठाकूर राष्ट्र सेवा दल रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते
संतोष ढोरे( रायगड जिल्हा कार्याध्यक्ष), सुरेखा वाघे, विजया मांडवकर, दर्शना म्हामुणकर रेखा कालेकर , राजश्री म्हामुणकर,(लाडीवली ग्रामस्थ प्रतिनिधी ) यांनी बोलताना सांगितले.







Be First to Comment