Press "Enter" to skip to content

मानवहित लोकशाही पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने व फुले ,शाहू ,आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ,लहुजी वस्ताद साळवे ,यांच्या विचारांवर आधारित स्थापन झालेल्या मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी येते कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला विविध समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी नवनिर्वाचित जिल्हा ध्यक्ष कानोबा झोंबाडे यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात मानवहित पक्षवाढीसाठी वाटचाल, संघटन, करायचे असून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोलाची साथ असणे महत्त्वाचे आहे.रायगड जिल्ह्यात,मातंग समाज बहुसंख्येने असून विविध संघटनेच्या माध्यमातून काम करत असून त्यांनी एकाच झेंडयाखाली येऊन कार्य करावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मानवाहित लोकशाही पक्ष मजबूत करून आपली ताकत, एकता दाखवून द्यावी असे आवाहन नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांनी केले.

लवकरच रसायनी परिसरासह रायगड जिल्ह्यातील कार्यकारणीची निवड करण्यात येणार असून प्रसंगी परिसरातील कार्यकर्त्यांनी मानवहित लोकशाही पक्षात सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले. मातंग समाज विविध पक्षातील गटात विभागला गेला असून आपल्या अभिमानासाठी स्वाभिमानासाठी आपल्या स्वतःच्या पक्षात सामील व्हा असे कानोबा झोंबाडे यांनी सांगितले.

यावेळी कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.