Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाची अन्यायकारक कारवाई

सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |  


पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईने व्यापारीवर्गात कमालीची नाराजी पसरली असून अतिक्रमण विभाग सरसकट कारवाई न करता ठराविक गाड्यावर व धंद्यावर कारवाई करत आहे त्यामुळे दालमे कुछ काला है अशी संशय येत आहे. पनवेल  महानगरपालिकेची अंधळं दलत आणि कुत्र पीठ खातं अशी अवस्था कर्मचारी वर्गानी केली आहे. 



कोरोनाच्या महामारीत अनेक कंपन्या व छोटे छोटे उद्योग बंद होवून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हाताला काम नसल्याने नागरिकात नैराश्य आहे.  त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये येणा-या भाजीच्या धंद्याकडे अनेकांचा कल आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत असलेल्यानी भाजी व फळांचे गाड्या व ठेले नागरिकांना त्रास होणार नाही अशा जागेवर सुरू केले आहेत.

असा धंद्यावर कळंबोली पालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून सरसकट कारवाई न करता भेदभाव केला जात आहे. ठराविक धंद्यावर कारवाई करताना अतिक्रमण विभागाचे दोन कर्मचारी बाजुच्या धंद्याला अभय देत आहेत. त्याामुळे धंद्यावाल्यामध्ये तीव्र  नाराजी पसरली असून मालकी हक्काप्रमाणे ते वागत असल्याचे पहायला मिळते. त्यांच्या मर्जीप्रमाणे येथील कारभार चालत असून शहरातीत मुख्य रस्तावर मुख्य चौक ( साईबाबा मंदिर चौक ) ते आयडीबीआय दरम्यान उभ्या असलेल्या  गाड्यावर कोणतीही कारवाई केली जात नसून कारवाई कारायच्या पाच मिनिटे अगोदर त्यांना सावध करून आम्ही आल्यानंतर तात्पुरते गाड्या किंवा ठेले हलवत जा असा मँसेज सबंधित अधिका-याकडून दिला गेला  आहे. 
 

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पालिका अधिका-याच्या आशिर्वादाने  अनधिकृत बांधकामांना उधाण आले असून, शहराना बकाल अवस्था येत आहे. या बांधकामामध्ये कळंबोली वसाहत नंबरने आहे. सिडको महापालिका सदरच्या प्रकारांना आला घालण्यात सफसेल अपयशी होत असल्याचे उघड होत असल्याचे ,चित्र स्पष्ट होत आहे.

तसेच सदरच्या प्रकाराबाबत महापालिका तसेच सिडको प्रशासन साळसूदपणे, व हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचे , वास्तववादी चित्र समोर येत आहे. त्यामुळे या गैर प्रकारच्या मुळाशी कोण आहे , याचा सखोल शोध घेतल्यास,, पनवेल महापालिका अधिकारी यांचे हात बरबटलेले असल्याचे राहिवाश्यांमध्ये चर्चिले जात आहे. अधिकारीच बांधकामामागे चालीस ते पंचेचालीस हजार रुपये घेत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. प्रभागील  पालिका अधिकार्‍यांनी आजतागायत अनधिकृत बांधकामा विरोधात शेकडो नोटीसा दिल्या पण एकही अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही. अनधिकृत बांधकामाना नोटीस हे माया जमविण्याचे अस्त्र ठरत आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.