वृद्धाश्रमात फळे व मिठाई वाटून केला वाढदिवस साजरा
सिटी बेल | पनवेल |
हरिग्राम ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख दीपक घरत यांनी विविध सामाजिक उपक्रमांतून आपला जन्मदिवस साजरा केला. भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात फळे व मिठाई वाटप करून जन्मदिन साजरा करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास फडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सामाजिक जाणिवेतून जन्मदिनाच्या सोहळ्यात हिडीस प्रदर्शन न करता सामाजिक कार्यातून समाधान मिळवण्यात दीपक घरत यांनी धन्यता मानली त्यांच्या या कृतीचे समाजाच्या सर्वच थरांतून स्वागत होत आहे. हरिग्राम गावच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारे दीपक घरत हे प्रथितयश पेंटिंग उद्योजक असून या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना ते रोजगार उपलब्ध करून देत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून समाज कार्याचा धडाका उडवून देत, दिपक घरत यांनी नेरे विभागातील उगवता तारा अशी ओळख कमावली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास फडके,हरिग्राम चे ग्रामपंचायत सदस्य सुधीर डागंरकर यांनी आपल्या मनोगतातून दिपक घरत यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य आशय पाटील,गुरुजी सुभाष जळे, पंडीत भोईर, राजेश जोशी, कैलास जोशी प्रताप घरत जगदीश घरत गणेश घरत रोहीत घरत भोलेनाथ घरत
करुणेश्वर वृद्धाश्रम चे संस्थापक समाजसेवक संतोष डोरे, ईश्वर डोरे, करुणाताई डोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील यांनी आपल्या बहारदार आवाजामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून त्यांनी दीपक करत करत असलेल्या अनेक सामाजिक कार्याचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.












Be First to Comment