खांदा कॉलनीत सांडपाणी रस्त्यावर, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण !
सिटी बेल | प्रतिनिधी | पनवेल |
पनवेल पालिकेच्या खांदा कॉलोनी सेक्टर ९ येथे ड्रेनेज लाईन जाम झाल्याने परिसरातील दुर्गंधी वाढली,प्रवासात अडचण निर्माण झाली वयोवृद्ध , स्त्री, लहान मुले प्रवास करू शकत नाही म्हणून अनेक त्रस्त नागरिकांनी शिवसैनिकां कडे धाव घेतली व ह्या विषयाच निवेदन शिवसैनिकांनी आज प्रत्यक्षात पाहणी करून सिडको ला दिले असल्याने निवेदनाची दाखल घेत सिडकोचे अधिक्षक अभियंता मोहिले, सहाय्यक कार्यकारी अभियंता डेकाटे, ठेकेदार भागवत तातडीने घटनास्थळी पोहचले . यावेळी शिवसैनिकांनी सिडको अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.

सिडको अधिकारी सध्या कोरोना काळात मनुष्यबळ कमी असल्याने वेळ होत असल्याचे म्हणत होते पण आम्ही आपल्या तक्रारी वर लवकरच मार्ग काढू म्हणून आश्वासित केले . तसेच माणसाच्या जीवनातील पाणी सारख्या अतिमहत्त्वाच्या बाबतीत सिडकोचे प्रशासन नियोजन का करत नाही त्यांना भविष्यातील वाढती लोकसंख्या च्या आधारे पाण्याच्या प्रवाहात वाढ करायला हवी होती असा प्रश्न सिडकोचे मुख्य अधिक्षक अभियंता गजानन दलाल यांना विचारले असता त्यांनी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले पण त्याच्या सोबत असणारे अधिकारी त्यांनी जणू पाणी विकणाऱ्या ठेकेदार ह्यांच्या टँकर कसे वाढतील ह्यासाठी चुप्पी केली की काय असा प्रश्न समोर येतो. पण त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के ह्यांनी एम जे पी अधिकारी पांढरपट्टे यांना समोर बोलावून एम जी पी कडून सिडको खांदा कॉलनी साठी किती पाणी पुरवठा केला जातो याची समोरासमोर माहिती घेतली व यामध्ये सिडको अधिकारी यांची बोलती बंदच झाली कारण एम जी पी पुरेसे पाणी पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले यंत्र आपले शिष्टमंडळा सोबत सर्व सोसायटी मध्ये कमी प्रमाणात पाणी येत असल्याचे सिडको च्या निदर्शनास पाहणीत आणून दिले.

सोसायट्या लाखोंच्या खर्चात टँकर ने पाणी विकत घेत आहे म्हणून सिडको अधिकाऱ्याने त्यावर दखल घेत तातडीने त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले . त्यावर शिवसैनिकांनी योग्य न्याय न मिळाल्यास शिवसैनिक रस्त्यावर तीव्र आंदोलन करेल असा इशारा ही दिला
यावेळी शहर प्रमुख सदानंद शिर्के सोबत त्यांचे उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख, संपत सुवर्णा, युवासेना उपविधानसभा अधिकारी कु. सुशांत सावंत, महिला शहर संघटिका सौ सानिका मोरे, उपशहरसघटीका असमा खान, उपशहरसघटक संजीव गमरे,उपविभाग प्रमुख जयराम खैरे, शाखाप्रमुख श्री. पुंडलिक म्हात्रे, शाखाप्रमुख श्री. मंगेश पवार, शाखाप्रमुख अतुल घुग, शाखाप्रमुख अरविंद कासारे,युवासेना शहर चिटणीस कु. सुयश बंडगर, शिवसैनिक तानाजी घारे, भोर काका तसेच शिवसैनिक व खांदा वसाहती मधील अनेक नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment