Press "Enter" to skip to content

नीता माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्रच्या जिल्हा अध्यक्षापदी नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

मा. नगरसेविका नीता सुनील माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी महिला विषयी केलेले कार्य पाहता त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार व अशा अनेक महिलांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करुन महिलांना न्याय देण्याचे कार्य करतील म्हणून संस्थेचे प्रदेश अध्यक्ष किसनराव पाटील यांनी त्यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल कामोठे पोलिस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.