सिटी बेल | केळवणे |
गेल्या आठवड्यात केळवणे गावात गुरूवारी मध्यरात्री २५ जूनला हरिभाऊ शंकर ठाकुर यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत सर्व सामानासहीत संपूर्ण घर जळून कुटुंब बेघर झाले होते. रा.जि.प.सदस्य ज्ञानेश्वर दशरथ घरत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला,त्यांचे शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न चालू आहेत.
परंतु अशा परिस्थितीत कोणतीही शासकीय मदतीची वाट न पाहता गावातील काही तरूणांनी व दानिक लोकांनी मदतीचा हात देऊन पिडित कुटुंबाला पूर्ववत उभे राहायचे बळ दिले. तसेच उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना या दुर्घटनेची वार्ता समजताच गावातील आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिडित कुटुंबाला १०,००० रूपयाची आर्थिक मदत करण्यात आली.
त्या वेळी विभाग प्रमुख डाॅ. भरत घरत, शाखाप्रमुख मारूती मोकल, युवासेना उपतालुका अधिकारी विक्रांत घरत, सरपंच अश्विनी घरत, ग्रा.पं. सदस्य गुरुराज ठाकूर,जयश्री कोळी, उपशाखाप्रमुख विजय कोळी, प्रकाश पाटील, धर्मांजी घरत, डि.के.पाटील, किसन ठाकूर, दिनकर ठाकूर, भगवान पाटील, भालचंद्र पाटील, केशव पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment