Press "Enter" to skip to content

चिरनेरच्या सेंकडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 14 वर्षांनी एकत्र येत केलं वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | सुभाष कडू |

उरण तालुक्यातील सेकंडरी स्कूल चिरनेर मधील 2008 सालच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल 14 वर्षांनी एकत्र येत,त्यांनी चिरनेर येथील बापुजी देव मंदिर परिसरात वृक्षारोपण केल.सदर वृक्ष अभय पाटील यांनी दिली होती.या वेळी शाळेतील स्मृती जागवताना प्रत्येकाचा तोच जोश, तोच उत्साह आणि तो खोडकरपणा पाहून पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरला आसल्याचे जाणवत होते.

शालेय जीवन संपले की, शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी धंदा या कारणांमुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी मित्रांच्या आठवणी असल्या तरी सर्व एकत्र येणे अशक्य असते. त्यात सासांरिक प्रपंच वाढल्याने सर्वच जण व्यस्त होतात. त्यामुळे 2008 साली शिकत असलेल्या चिरनेरच्या सेंकडरी स्कुलमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

शाळेतील स्नेहल जाधव,रोशन पाटील व किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन व्हाट्स अपच्या माध्यमातून सर्व मित्र मंडळींशी संपर्क करून त्यांना एकत्र आणले. त्या निमित्ताने निसर्गाप्रती आपले दायीत्व म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.