Press "Enter" to skip to content

१५ वित्त आयोगातून टेंभरी ग्रामपंचायतीतील अदिवासी वाड्यांचा पिण्याचा प्रश्न मार्गी

सिटी बेल| काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

पाणी म्हणजे जिवन, कारण पाण्याशिवाय कोणताही सजिव जिवंत राहू शकत नाही. मात्र पाणी प्रत्येकाला मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी यांच्या माध्यमातून आणी १५ वित्त आयोगातून टेंभरी अदिवासी वाडी,कोपरी अदिवासी वाडीतील ग्रामस्थांना प्रत्येकी वेगवेगळे नळ कनेक्शन देण्यात येत आहे.पुर्वी या ठिकाणी पाण्याचे नळ होते मात्र घरपट्टीस नव्हते ते सार्वजनिक होते.मात्र टेंभरी ग्राम पंचायत सरपंच उप सरपंच आणी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येकांच्या घरोघरी नळ देण्याचा शुभारंभ करण्यात आले.

ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी या विभागात गावे तसेच अदिवासीवाड्या येत आहे. मात्र घरोघरी पाण्याचे नळ असावे म्हणजे कोणतीही समस्या निर्माण होणार नाही या विचारांतून अदिवासी वाड्या मध्ये घरोघरी नळ योजना पुरवठा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.तसेच काही दिवसात त्यांना मुबलक पाणी मिळणार असल्याचे सरपंच दिलीप ठोंबरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

यावेळी वाड्यामध्ये नळ योजना सुरु असतांना सरपंच,ग्रामसेवक ह्या योजनेचा आढावा घेत आहे.यावेळी उपसरपंच सुरेखा पाटील,ग्रामसेवक गोकुळदास राठोड,सदस्या विमल कातकरी,रेश्मा ठोंबरे,रसिका म्हात्रे,सविता गायकवाड, शशिकला ठोंबरे,सदस्य संतोष कातकरी, विलास म्हात्रे,रुपेश पाटील,रोहीदास आगज,विजय ठोंबरे अदि ग्रूप ग्राम पंचायत ते सदस्य सहकार्य करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.