२८ वर्षीय विवाहीत महीला पोलीसाने का केली आत्महत्या ? कारण गुलदस्त्यात !
सिटी बेल | पुणे |
पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे . दरम्यान , आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या २८ वर्षीय महिला पोलिसाचे नाव श्रद्धा शिवाजीराव जायभाये असून सध्या त्या वाकड येथील कावेरीनगर पोलीस लाईन , बिल्डिंग नंबर 21 रूम नंबर ४ वाकड पुणे. मूळ गाव शेगाव असे आहे. श्रद्धा जायभाये या विवाहित असून त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग केरळमध्ये आहे. श्रद्धा आणि शिवाजी यांना एक दोन ते तीन वर्षांची एक लहान मुलगी आहे.
श्रद्धा यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने त्यांनी काल रविवारी त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे सोडले होते.
श्रद्धा यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रिणीने वाकड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वाकड पोलीस पोलीसलाईन कावेरीनगर येथे पोहचले असता जायभाये यांचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर श्रद्धाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. उपायुक्त भोईटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुंगळीकर यांच्यासह इतर पोलीस आधिकर्यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्रद्धाने आत्महत्या का केली याविषयीचा तपास सुरू आहे.








Be First to Comment