Press "Enter" to skip to content

डॉ संजय सोनावणे यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा

सिटी बेल | पनवेल |

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे अध्यक्ष,तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सन्माननीय सदस्य डॉ संजय सोनावणे यांचा जन्मदिन सोमवार दिनांक ५ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा या गावातील जि प शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच डॉ संजय सोनावणे यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने माणगाव, लोणेरे,इंदापूर,गोरेगाव,या विभागातील स्वच्छता दूतांना स्वच्छता किट चे वाटप करण्यात आले.सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले,आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले.

भोकर पाडा येथे झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमाला डॉ संजय सोनावणे यांच्या समवेत पनवेल तालुका पत्रकार विकास मंच चे अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सचिव मंदार दोंदे,संजय कदम, विवेक पाटील,अविनाश कोळी,अनिल कुरघोडे,प्रवीण मोहोकर,राजू गाढे,माजी उपसरपंच धनंजय पाटील, साजन फुलोरे,हनुमान फुलोरे,किशोर फुलोरे, संतोष भोपी,संजय पाटील,चेतन पोपेटा, निलेश नाईक,सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील जी प शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ संजय सोनावणे म्हणाले की,जन्मदिवस साजरा करत असताना आपण समाजाचे ऋण फेडले पाहिजे या भावनेतून आयोजित या कार्यक्रमात मला विद्यार्थ्यांना काही देता आले त्याचे समाधान आहे.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी मंचाचे आभार मानतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.