सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरणमधील बीपीसीएल कंपनीत माथाडी कामगारांची भरती होत आहे. तरी यापुढे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचीच भरती करण्यात यावी अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर यांनी मालवाहतूक कामगार मंडळाला दिला आहे.
उरणमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हे बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. उरणमधील बीपीसीएल कंपनीत माथाडी कामगारांची भरती होत आहे. यामध्ये भरतीमध्ये लाखो रुपये भरून बाहेरील भरती केली जात असल्याचा आरोप जिप सदस्य विजय भोईर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मालवाहतूक कामगार मंडळ यांना लेखी पत्रव्यवहार करून बीपीसीएल कंपनीत ९७ माथाडी कामगार असून त्यातील फक्त ५ कामगार हे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत. इतर कामगार हे बाहेरील आहेत.
तरी भविष्यात नवीन माथाडी कामगार भरती करताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळाला भरती प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे देण्यात येतील. त्यानंतरही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले गेले नाहीतर त्या विरोधात स्थानिक पातळीवर आंदोलन होतील. याची सर्वस्वी जबाबदारी मंडळावर राहील. याचा सारासार विचार करून माथाडी कामगार वाढवून त्यामध्ये स्थानिक कामगारांची भरती करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी दिला आहे.








Be First to Comment