Press "Enter" to skip to content

तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या हस्ते कलम आंबे लागवड

सिटी बेल| काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

हरितक्रांतीचे प्रेणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताचे आणी कृषी दिन तथा कृषी संजीवनी सप्ताह समारोहाचे औचित्य साधून खालापूर तालुक्यातील तहसीलदाराच इरेश चप्पलवार यांच्या हस्ते आंबा कलम लागवड कांढरोली – वनखळ येथे शेतकरी अरविंद दळवी यांच्या शेताच्या बांधावर सुमारे ४० हापूस कलमी आंबे महाराष्ट्र ग्रामीण रोजगात हमी योजने अंतर्गत ही लागवड करण्यात आली.

शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर किंवा माळरान या ठिकाणी जागा ओसाड असते आश्या ठिकाणी वृक्ष लागवड केल्यास आपणांस त्या पासून फळे आणी सावळी मिळू शकते.यासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकरी वर्गांस फळ झाडे,तसेच विविध प्रकाचे वृक्ष वाटप करण्यात येत असते.

यावेळी या वृक्ष लागवड कार्यक्रमास तहसीलदार इरेश चप्पलवार,मंडळ कृषी अधिकारी साळके,कृषी परिवेक्षक शिंदे,कृषी साहाय्यक सारंग,चौधरी, गावातील पोलीस पाटील – गणेश दळवी,त्यास समवेत शेतकरी कृषी मित्र ग्रामस्थ अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.