Press "Enter" to skip to content

केंद्रीय नौकानयन मंत्री मनसूख मांडरीया यांना बीएमएस पोर्ट महासंघाचे निवेदन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

केंद्रीय नौकानयन मंत्री मनसूख मांडरीया हे सिरम इंस्टीटयुट पुणे येथे भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना देशातील विविध पोर्ट मधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी या मागणी संदर्भात पुणे येथे बीएमएसच्या राष्ट्रीय नेत्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

त्यावेळी मुंबईचे खासदार मनोज कोटक, बीएमएसचे राष्ट्रीय नेते आण्णा धुमाळ, बीएमएस पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.