सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
प्रदूषणामुळे जागतिक स्तरावर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास तसेच सध्या कोरोनाच्या काळात आपल्या देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेलेले हजारो जीव हे अतिशय भीषण असे वास्तव अनेकांनी अनुभवले. एक जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आज पर्यावरणाचा तोल सांभाळला जावा याकरिता विविध वृक्षांची लागवड करत समाजाप्रती आपला खारीचा वाटा उचलला आहे.

याप्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांच्या आवाहनानुसार राज्य कार्याध्यक्षा श्रुती उरणकर , रायगड जिल्हा अध्यक्षा रेखा घरत, तालुका अध्यक्षा निर्मला पाटील, सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षा ज्योतिका हरयाण, सचिव सुप्रिया पाटील, कणकवली तालुका अध्यक्षा शोभा पास्टे, कुडाळ तालुका अध्यक्षा दीपा राजू ताटे,सचिव तन्वी मंगेश सावंत, पुणे येथून निशा जाधव, नवी मुंबई सदस्या सिमा घरत, योगसाधना पाटील,अश्रया शिवकर, नयना पाटील,रंजना पाटील, निकिता पाटील, समिक्षा पाटील, ठाणे जिल्ह्यातून तन्मयी उरणकर, सविता ठाकूर,प्रीती ठाकूर, कणकवली येथून अंकिता कोकाटे आणि इतर मयुरी गुरव, अनिता गुरव, शर्वरी कोकाटे, शर्वरी गुरव, कुडाळ सदस्या कुमारी रुपाली धाकू वरक, सिंधुदूर्ग सदस्या दुर्वा मानकर,स्वरा खांडेकर,नेहा कोळंबकर,सविता चव्हाण,स्नेहल तांबे,नेहा मानकर आदी उपस्थित होत्या.









Be First to Comment