सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
बँकिंग उद्योगातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे समजून बँकेने डॉक्टर्स दिना निमित्त डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या, नवी मुंबई झोन अंतर्गत नवीन पनवेल शाखेने आपले सन्माननीय डॉक्टर्स ग्राहक नील हॉस्पिटलचे संचालक, डॉ. पंढरीनाथ नील, डॉ. शुभदा नील, स्पर्श हॉस्पिटलचे संचालक, डॉ. सचिन नलावडे, डॉ. रोहित नलावडे व पायोनियर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुर बामणे यांना त्यांच्या क्लिनिकला भेट देऊन ते देत असलेल्या कोरोना संकटाशी अविरत झुंजींबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
डॉक्टर्स जे आपला जीव धोक्यात टाकून मानवांचे बहुमूल्य प्राण वाचवीत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. तसेच बँकेने डॉक्टर हेच पृथ्वीतलावरील खरे हिरो आहेत अशा भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर म्हणाल्या की, सध्याच्या ह्या भयंकर कोरोना महामारीतून मानवाचे खऱ्या अर्थाने बहुमूल्य संरक्षण जर कोणी करत असेल तर ते आपण डॉक्टर्स आहात. गेल्या दिड वर्षांपासून अविरत वैद्यकीय सेवा देत आहात. दिवसेन दिवस आपल्या कामाचा ताण वाढतो आहे पण आपण मानवकल्याणासाठी मोठे मोलाचे कार्य करीत आहात.
याप्रसंगी अरविंद मोरे म्हणाले की, आपण आमचे सन्माननीय ग्राहक आहात. आमचे सुद्धा सेवा देणे हेच प्रथम कर्तव्य आहे. आपण देत असलेल्या मानव सेवेबदल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. बँक आपल्या प्रति समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते व भविष्यात सुद्धा आपण असेच मानव कल्याणाचे कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो.
याप्रसंगी डॉ. पंढरीनाथ नील, डॉ. शुभदा नील, डॉ. सचिन नलावडे, डॉ. रोहित नलावडे व डॉ. अंकुर बामणे यांनी बँकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल बँकेचे आभार मानले व या उपक्रमामुळे नक्कीच त्यांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी बँकेचे उत्साही कर्मचारी आकाश शिरवय्या सुद्धा उपस्थित होते.








Be First to Comment