एक आठवड्यात लागवडीची कामे पुर्ण होतील, शेतक-यांनी वर्तविला प्राथमिक अंदाज
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
जून महिन्यातील मृग नक्षत्र आणी आद्र नक्षात्र पावसाच्या दमदार आगमन होत असल्यामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.भात लागवड करण्यासाठी राब चांगले तयार झाले असून मजूरा अभावी भात लागवड कामे खोळंबळी आहे.अधूनमधून पावसाच्या सरी येत असून या सरी बळीराजासाठी हव्या आहेत.यामुळे जिद्दीने आणि जोमाने बळीराजा भात लागवड करण्यासाठी सज्य झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. एक आठवड्यात भात लागवडीची कामे पुर्ण होतील असा प्राथमिक अंदाज शेतक-यांनी व्यक्त केला.
दिवसभरामध्ये पावसाच्या सरी येत असून जिकडे तिकडे भात लागवड सुरु असून या कामासाठी मजूरांची मनधरणी सुरु आहे.ज्यांची कमी भात शेती आहे.त्यांची भात लागवड पुर्ण झाली आहे.तर काहीच्या शेत मजूर आभावी शेतीची कामे खोळंबळी आहे.मिळेल त्या मजुरांना घेवून भात लागवड गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे.गेले अनेक दिवस पाऊस पडत असल्यामुळे शेतातील राब उत्तम झाले असून, लागवडीस सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे शेतात पावसाचे आगमन दमदार झाल्याने शेतकरी सुखावला.
तालुक्यातील ग्रामीण भागात भात लागवड करण्यासाठी वेग घेतलेला चित्र सध्या पहावयास मिळत आहे.पावसाच्या अगमनाने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले असून ग्रामीण भागात नालेही दुथडी भरून वाहू; लागले आहे.शिवाय शेतामध्ये मुबलक पाणी जमा झाल्यामुळे भात शेती लागवडीस जोर धरला आहे.यामुळे एक आठवड्याच्या आत भात लागवड पुर्ण होईल असा प्राथमिक अंदाज शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.








Be First to Comment