Press "Enter" to skip to content

आर्या वनौषधी तर्फे डॉक्टररुपी देवदूतांचा गौरव

सिटी बेल | पनवेल |

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थे तर्फे डॉक्टर रुपी देवदूतांना वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देवून गौरविण्यात आले.

आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास एकता आवाज फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे,आर्या पाटील,पत्रकार दत्तू कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही,चिरायता,वेखंड आदी वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देण्यात आली.

कोरोना काळात डॉक्टरांना देवाचं रूप मानलं गेलं .अनेक रुग्णांसाठी तर डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत वाटला.कोरोना काळात या देवदूतांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.अशा या डॉक्टर रुपी देवदूतांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे संस्थेचे अध्यक्ष व आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.