Press "Enter" to skip to content

कोविड योद्धे डॉक्टरांबद्दल  ‘दिशा’ची कृतज्ञता

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त केला डॉक्टरांचा सन्मान

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

इतर आजारांमध्ये ही रुग्णांना जीवदान देण्याचे काम डॉक्टर करतातच.परंतु कोरोना वैश्विक संकटामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना या महामारी तून वाचवण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे. ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील या डॉक्टरांचा  दिशा महिला मंचच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.       

वैद्यकीय शास्त्र पुढारल्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढले. अनेक गंभीर आजारातून आजही रुग्ण बरे होतात. अर्थात योग्य पद्धतीने डॉक्टर औषधोपचार करत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून आला. वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळे  तज्ञ डॉक्टर उपचार करतात. उपचाराच्या सुद्धा अनेक पद्धती डॉक्टरांनी शोधून काढलेल्या  आहेत. कारण  डॉक्टर हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरतात.

दरम्यान कोरोना या संकटात आज संपूर्ण जग अडचणीत आले आहे. लाखो जणांना कोरोना चा संसर्ग झाला. त्यापैकी अनेक जण या आजारातून बरे झाले. अर्थात त्यांच्यावर डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने ते कोरोना मुक्त झाले. दरम्यान स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने रुग्ण सेवा केली. हे करत असताना काही वैद्यकीय तज्ञांना सुद्धा कोरोना झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि परिचारिका कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना या आजारातून बरे करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

रात्रंदिवस रुग्णसेवा करणारे डॉक्टरांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम काही प्रमाणात  झालेला आहे. कोरोना विरोधात लढाई करण्यासाठी सर्वात आघाडीवर हे डॉक्‍टरच आहेत. त्यांच्याशिवाय या  महामारी बरोबर दोन हात करता येणे शक्यच नाही. पनवेल परिसरात खाजगी कोविड डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. त्यामुळे अनेक रुग्ण कोरोना मुक्त होऊ शकले.

या कोविड  योद्ध्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. परंतु त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनुषंगाने दिशा महिला मंचच्या संस्थापिका  निलम आंधळे आणि त्यांच्या सहकारी रेखा ठाकुर  यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सन्मान केला. निमित्त होते राष्ट्रीय डॉक्टर दिन

झाडाचे रोप देऊन केला सन्मान

कोरोना रुग्णांची सेवा करीत असलेल्या  डॉक्टरांप्रती दिशा महिला मंचच्या वतीने खऱ्या अर्थाने सामाजिक ऋण व्यक्त करण्यात आले. संबंधित डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण पूरक अशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
डॉक्टर महापौरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छाराष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पेशाने डॉक्टर असलेल्या महापौर डॉ कविता चौतमाल यांची निलम आंधळे यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

   

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.