कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
काहि महिन्यापूर्वी विश्रामगृहावर थकित वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी थांबवा अशी मागणी होत आहे.
तीनच वर्षापूर्वीच लाखो रूपये खर्चून डागडूजी आणि रंगरंगोटी करण्यात आली होती.याऊलट विश्रामगृहाच्या मागील बाजूस कर्मचारी निवासाची प्रचंड दुरावस्था झाली असून साप व विंचूचा वावर वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी नुकत्याच झालेल्या कामाची पुन्हा तोडफोड करणे कितपत योग्य आहे .

कोरोना काळात महत्त्वाची कामे ठप्प असताना विश्रामगृहासाठी मात्र निधी उपलब्ध झाला आहे.एक व्हीआयपी सूट असताना दुसरा सूटसाठी तोडफोड ला, सुरवात झाली आहे. लाखो रुपयांची उधळपट्टी चा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. याठिकाणी खानसामा आणि शिपाई नेमणूकिस आहे.परंतु निवासस्थानाची झालेली दुरावस्था त्यामुळे विश्रामगृहातील एका कोपऱ्यात दिवस काढत आहेत . विश्रामगृहाची दुरुस्ती तातडीची आवश्यक होती का? असा देखील प्रश्न देखील पडला आहे.








Be First to Comment