देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देणे लागतो : डॉ. राजाराम हुलवान
सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन |
आपण देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देने लागतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने निसर्गातील झाडांचे महत्त्व समजून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.असे प्रतिपादन
माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी कै.हरिश्चंद्र म्हात्रे आणि कै.म्हात्रे यांच्या स्मरणार्थ थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जीत नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले.
यावेळी वृक्षारोपण बाबत उपस्थितांना माहिती देताना प्रतिपादन माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सांगितले की, आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे .एका दिवसात सामान्यत: माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे श्वसन करतो.
एका सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे. म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते.सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.आजच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्
लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळा. कापडी पिशव्याचा वापर करा. वृक्षतोड करू नका निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो.
निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण करू शकू. अशोक, पिंपळ, शेंगा यांसारखी झाडे सर्वत्र लावण्याची प्रामुख्याने गरज आहे
कै.हरिश्चंद्र म्हात्रे आणि कै.म्हात्रे यांच्या स्मरणार्थ थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जीत नगर येथे दोनशे वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर अलिबाग यांनी फेज 3 मधील वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला,हे वृक्षारोपण माणुसकी वाचनालयाला जागा उपलब्ध करून देणारे कै.हरिश्चंद्र म्हात्रे आणि कै.श्री म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 200 झाडे लावून कार्यक्रम पार पाडला , आशिष कडू रा. पेण यांनी सर्व झाडे उपलब्ध करून दिली ,
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास रोटरी क्लब सी शोर अलिबाग सचिव निमिष परब , RCF कडून अजय घरत, माणुसकी टीम संजय काळेल,ऋषिकेश वाडकर, विनायक म्हात्रे, इरफान जमेदार, सतीश कणसे, संतोष कणसे,
तानाजी आगलावे,विशाल आढाव, सिद्धांत, विपुल, रेखा पाटील , सागर वाघे,नीता वाघे,कृष्णा वाघमारे,अमृत म्हात्रे,आनंद पांडव,शिवतेज कणसे, मधुकर जाधव उपस्थित होते.








Be First to Comment