सिडकोच्यावतीने 1997 साली करण्यात आली होती नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा
सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
मध्य रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या नेरुळ-उरण मार्गाच्या दुसर्या टप्याचे काम भूसंपादना अभावी रखडले आहे. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम लवकरच पुर्ण होऊन हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येण्याची अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे.
सिडकोच्यावतीने 1997 साली नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली होती. 27 कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला 2021 मध्ये सुरुवात झाली. या प्रकल्पाचा 67 टक्के खर्च सिडको आणि 33 टक्के खर्च रेल्वे करीत आहे. 500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प रखडल्याने त्याचा खर्च आता सुमारे 2 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे.
4 नोव्हेंबर 2019 रोजी नेरुळ-उरण रेल्वे मार्गातील खारकोपरपर्यंत पहिल्या टप्यात रेल्वे सेवा सुरु झाली.
सध्या मार्गावर लोकलच्या 8 फेर्या धावतात. (टाळेबंदीआधी दररोज 40 फेर्या). खारकोपर रेल्वे स्थानकामुळे उलवे नोड नवी मुंबईला जोडला गेला आहे. या प्रकल्पातील दुसर्या टप्यातील 14.60 किलोमीटरच्या खारकोपर ते उरण मार्गाचे काम सध्या सुरु आहे.
मध्य रेल्वेने टाळेबंदीत हा मार्ग पुर्ण करण्यावर भर दिला आहे. परंतु 8 ते 11 किलोमीटरच्या दरम्यानची 4.479 हेक्टर वनजमिनीचा प्रश्न आजही सुटलेला नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
औदुसरा टप्पा पुर्णत्वाला आल्यास नवी मुंबई उरण प्रवास सुखकर होणार आहे. खारकोपर – उरण दरम्यान 5 स्टेशन, 2 मोठे पुल, 41 छोटे पुल, 2 रोड अंडर ब्रिज आणि 4 रोड ओव्हर ब्रिज आहेत.








Be First to Comment