Press "Enter" to skip to content

“ते” पुन्हा आले..मात्र देशमुखी कायम

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी गणेश देशमुख यांची पुन्हा नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी म्हणून कार्यरत असणारे गणेश देशमुख यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार पनवेल महानगरपालिका आयुक्त या पदावर प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात आली आहे. तर तत्कालीन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. आज पुन्हा अचानक शासनाकडून बदल्यांचे सत्र सुरू होवून त्यामध्ये गणेश देशमुख यांची पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.