Press "Enter" to skip to content

दमदार पावसामुळे भात लागवडीस दमदार सुरुवात

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

चार दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा धो धो बरसायला सुरुवात केल्याने शेतकरी राजाचा चेहराआनंदित झाला आहे.तर पावसाच्या दमदार सुरूवातीने लावणीच्या कामाला दमदार सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्हा हे भाताचे कोठार असे म्हणतात.त्याचप्रमाणे रोहा तालुक्यात दुबार भातशेती असल्याने रोह्याला भाताचे कोठार म्हणणे वावगे ठरणार नाही येवढ्या प्रमाणात शेती केली जातेय.या वर्षी मान्सून वेळेवर सुरू झाल्याने पेरणीची कामेही योग्य वेळेत व योग्य कालावधीत पुर्ण करण्यात आली.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून चांगल्या स्वरूपात पाऊस पडत असल्याने भाताची रोपेही लागवडीस योग्य झाल्याने
शेतकरी वर्गही सुखावला आहे.तर मागील काही दिवस दडी मारून बसलेल्या अखेरीस गेली दोन दिवसपासून पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने झाल्याने शेतकरी वर्गाने लावणीच्या कामाला प्रारंभ केला आहे.कोरोना काळात व्यापार उद्योग बंद आहेत हाताला काम नाही असे असताना शेती करण्याचा निर्णय शेतकरी राजानी घेतला आहे.

या पुढे रोह्यात शेती बहरणार आहे पुर्वी न परवडणारी शेती आता भाताला भाव मिळत असल्याने परवडत आहे.सध्या भाताला ₹.१४०० ते १८०० भाव मिळत आहे तसेच शेतकरी नविन विकसित बियाण्यांचा वापर करित असल्याने तांदूळ सुद्धा चांगल्या प्रतिचा मिळत आहे.त्यामूळे अनेक वर्षानंतर भातशेतीला पुन्हा एकदा महत्व आले आहे. यामध्ये कृषी खात्याचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा पाऊस चांगला बरसत असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.

कोरोना चक्रिवादळा सारख्या संकटान समोरे जाऊन दु:ख विसरुंन शेतकरी भातशेतीच्या कामात मग्न झाला आहे.हिच तर कोकणी माणसाची खाशियत आहे.याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.