नामात तुझ्या
एका मोरपीसात तुझ्या… जीव अडकतो आहे
लीला तुझ्या ह्या अशा…. जग पाहतो आहे
कृपा असावी तुझी… जीवनात आज वाटे
अभास जरी तुझा… तुलाच पाहतो आहे
भक्तीरसाने सारे… आकाश हे व्यापलेले
जगण्यात स्थैर्य.. चरणीच पाहतो आहे
नामात तुझ्या बुडालो सांगु कसे कुणाला
आधार जीवनाचा.. तुझ्यात पाहतो आहे
श्वासात तुच आहे.. जगण्यात तुच आहे
नामाने तुझ्याच हे.. जग तारते आहे
नको सोडूस साथ विश्वास जगण्याचा
नामात तुझ्याच.. विश्व समावले आहे
संगीता देशपांडे, नवीन पनवेल
Be First to Comment