सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
रायगड जिल्ह्यात उरण शहर व ग्रामीण भागात “शेतकरी वाचवा,देश वाचवा”हे घोषवाक्य घेऊन आंदोलन करण्यात आले. उरण शहरातील कार्यक्रमात महात्मा गांधींच्या पुतळ्याला डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे व किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली.
या धरणे आंदोलनात डीवायएफआय, किसान सभा, सीआयटीयु व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. किसान सभा सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी आजच्या देशव्यापी आंदोलनाची माहिती दिली. कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना द्यावयाचे निवेदन वाचून दाखविले.
२६जून१९७५रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी जाहीर केली.देशात लोकशाही टिकली पाहिजे या करिता सुरु झालेल्या आंदोलनात हजारो आंदोलकांना १८ महिने जेल मध्ये टाकले.२०कलमी कार्यक्रमाची सक्ती त्यावेळी केली होती.शेवटी १९७७च्या निवडणूकीत कॉंग्रेसला हार पत्करावी लागली. प्रथमच देशात कॉंग्रेस विरोधी सरकार स्थापन झाले होते.
आजही अघोषित आणीबाणी सुरू आहे.मोदींचे सरकार शेतकरी, कामगार,सर्व सामान्य जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्रसरकारने पारीत केलेले शेतकरी विरोधी तीन्ही कृषी कायदे रद्द करा म्हणून गेली ७ महीने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर लढत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्रीय सरकार दुर्लक्ष करत आहे. वीज विधेयक २०२० हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातून लुट करणारे वीज विधेयक मागे घ्या म्हणून सांगत आहेत ते ऐकण्याच्या स्थितीत केंद्र सरकार नाही. ४कामगार संहिता मंजूर करून भारतातील कामगारांचे मुलभूत अधिकार नाकरत आहे. कामगाराला गुलाम बनविणारे हे कायदे आहेत,म्हणूंन कामगार लढत आहेत. आज महागाई गगनाला भिडली आहे.पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत.खाद्यतेलही खुप महागले मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करत नाहीत.
कोवीड-१९मुळे सर्व सामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल बनले आहे. उत्पन्नाचे साधन नाही म्हणून २०कोटी जनता बेरोजगार बनली आहे.
१६जानेवारी पासून सुरू झालेले लसीकरण संथगतीने सुरू आहे.दुसऱ्या लाटेत मृत्यू दर वाढला आहे,तिसरी लाट येणार आहे त्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना लागण होण्याची शक्यता आहे.मात्र गेल्या दिड वर्षात केंद्र सरकारने आरोग्य यंत्रणा सुधारण्यात म्हणावी अशी प्रगती केली नाही. यामुळे जनतेमध्ये संताप आहे.
अशा शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध आज देशभरात केला आहे.उरण मधील आंदोलनात कोरोना महामारी विरुद्ध शासनाने जाहीर केलेल्या निती नियमांचे पालन करुन किसान सभा,सीआयटीयु, डीवायएफआय, जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात आंदोलन केले. या कार्यक्रमात युवा नेते संतोष ठाकूर, राकेश म्हात्रे, पद्माकर पाटील, अमित पाटील, प्रशांत पाटील,हिरामण पाटील, सुधीर पाटील, महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील, निराताई घरत, रजनी पाटील, सविता पाटील, किसान सभेचे रवी कासूकर, पराग ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
तर शेतीची कामे सुरू असल्याने व कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपल्या गावात महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी वाचवा,देश वाचवा फलक घेऊन आपले फोटो सोशल मिडियावर पाठवून आंदोलनात सहभाग घेतला व देशव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला.








Be First to Comment