विद्यार्थ्यांना योग्यवेळीच मार्गदर्शन होणे गरजेचे आहे,त्यामुळेच सेवाभावी अधिकारी निर्माण होतात – शिवव्याख्याते प्रशांत देशमुख
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
विद्यार्थ्यांना योग्यवेळीच मार्गदर्शन केले पाहिजे,आणि त्यांना शिक्षकच घडऊ शकतात,त्यामुळे खालापूर तहसीलदार यांच्यासारखे उत्तम प्रशासकीय अधिकारी निर्माण होतात,असे उदगार शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी काढले.
कोरोना योद्धा कै. महेश मधुकर कळमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दिलासा फाउंडेशन खालापूर व संस्थापक अध्यक्ष मनोज कळमकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तहसीलदार इरेश चप्पलवार,प्रगत शेतकरी व तालुक्यातील १७ गुरुजनांचा गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर म्हणाले कुठल्याही प्रसंगात अहोरात्र काम करणारा अधिकारी मी प्रथम पाहिला, असा अधिकारी मिळणे हे तालुक्याचे भाग्य आहे.तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणारा,चक्रीवादळ,निसर्गहानी,कोविड सारख्या महामारीच्या काळात व खोपोली येथे उभारलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी सर्वप्रकारची मदत तहसीलदार यांनी केली आहे,असे सेना नेते नवीन घाटवळ यांनी सांगून त्यांच्या कामाची पोचपावती दिली,तर आपत्तीच्या काळात आपल्या कार्यालयात अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ठेऊन मदत करणारा अधिकारी अशा शब्दात खालापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी गौरविले.
सर्व मान्यवरांनी शिक्षक व तहसीलदार यांच्या कार्याचा उल्लेख केला.आमच्या गौरवाने आमची जबाबदारी वाढली असे शिक्षक यांनी सांगितले.आपण आपले कर्तव्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असून माझा झालेला गौरव हा संपुर्ण कार्यालयाचा असून तो मी माझ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना देत असल्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले.
माजी सभापती उमेश गावंड, श्यामभाई साळवी,कायदेतज्ज्ञ राजेंद्र येरूनकर, डॉ.रणधीर खंदारे,खालापूर शिक्षण संस्था अध्यक्ष संतोष जंगम,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा,व्यन्ग चित्रकार सावंत,प्रगतशेतकरी पिंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पत्रकार उपस्थित होते.








Be First to Comment