पावसाच्या क्षणभर विश्रांतीमध्ये शेतीच्या कामासाठी बळीराजा सज्ज
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गेले दोन ते तीन आठवडे पावसाचे अगमन होत असल्याने शेतीची कामे पुर्णपणे खोळंबली होती.मात्र पाऊस क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळे आता बळीराजाला जाणवू लागले आहे.पाऊस येत असुन आणी लगेच जात असल्याने या वेळेत शेतीची कामे करण्यास शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे.
यामुळे ग्रामीण भागात अग्रेसर असलेले लाकडी नांगर घेवून शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.खांद्यावर चाबूक,खिल्लारी सर्जा – राजांची डौलदार बैलजोडी,अन औतावरील मधूर गीतांच्या आरोळीने रानोमाळ गरजू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
यामुळे खरीप पिकांच्या पूर्व मशागतीच्या कामांची धांदल उडाली आहे. सकाळ – सायंकाळ हा परिसर बळीराजाच्या औताच्या गीतांच्या मैफिलीने रंगून जात आहे. रानपाखरांच्या गाणार्या स्वर अन बळीराजाची शाहीर गीते, सर्जा – राजाच्या गळ्यातील घुंगारांचा आवाज या. मंजूळ स्वरांनी रानोमाळ संगीतमय झाला असून शेतीची कामे करण्यास बळीराजा मग्न झाला आहे. औतावरील गीतांच्या मधूर मैफलीमध्ये सर्जा ‘राज्याच्या नावानं गीत गाणे, ओव्या गाणे, बैलांना हाक देणे आसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे यामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय हे निश्चित.








Be First to Comment