शीतलताई करदेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आस्था अनाथ महिला निवारण केंद्राला अन्नधान्य व वृक्ष लागवडी साठी रोपे भेट
सिटी बेल | कोल्हापूर |
ब्रूसेल्स इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सच्या सदस्या ! नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस,नवी दिल्ली. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतलताई करदेकर यांचा वाढदिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युनियनच्या वतीने अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
शिरोळ तालुक्याच्या वतीने मिरज येथील आस्था अनाथ महिला निवारण केंद्राला भेट देऊन तांदूळ, जोधंळा, साखर, चहा पुड असे अन्न धान्य व वृक्ष लागवडीसाठी रोपे देण्यात आली. पुढील वाढदिवसाच्या निमित्ताने वेळीे झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी संस्थेचे शाहिन शेख सर व अध्यक्षा सुरेखा शेख यांच्याकडे हे सर्व अन्नधान्य सुपूर्द करण्यात आले. शाहिन शेख सर यांनी फोनवरून आस्था परिवारा कडून शीतलताई करदेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि शीतलताईच्यां कार्याबद्दल तोंड भरून कौतुक केले.व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एनयूजे महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष डाॅ सुभाष सामंत,शिरोळ तालुका कार्याध्यक्ष विनोद पाटील,सचिव मदन गावडे, समन्वयक बाळासाहेब कांबळे, इकबाल इनामदार, प्रणव कुलकर्णी, आर.पी. आयचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल बागवान, सामाजिक कार्यकर्ते आसिफ पिजांरी.व आदी पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment