Press "Enter" to skip to content

राजे शिवछत्रपती आँनलाईन काव्यसंमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मंडणगड तालुका शाखेचा उपक्रम

सिटी बेल | रोहा-रायगड | नंदकुमार मरवडे |


अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका शाखेचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय आॕनलाईन राजे शिवछत्रपती काव्यसंमेलन गुगल मिट अॕपवर संपन्न झाले.

सुरुवातीला संदीप तोडकर, मंडणगड तालुका अध्यक्ष यांनी मान्यवरांचे स्वागत केले नंतर सौ.संगीता पंदीरकर, मंडणगड उपाध्यक्षा यांनी गणेशस्तवन सादर केले तसेच डाॕ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा यानी गणेशस्तवन व सरस्वती स्तवन सादर करून रसिकांची दाद मिळवली व नंतर मार्गदर्शन केले. स्वर्गीय राजकुमार काळभोर सर यांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली. यानंतर सौ. मंजुशा गवई, पालघर जिल्हा
उपाध्यक्षा यानी उपस्थित मान्यवरांचा आपल्या ओघवत्या शैलीमध्ये अल्प परिचय करून दिला.

शरद गोरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संमेलनाध्येक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनात छ. शिवाजी महाराज यांचा इतिहासच उलघडून सांगताना सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर श्रीमती शुभांगीताई काळभोर राष्ट्रीय
उपाध्यक्षा, प्रमुख अतिथी यानी
आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त
करून सर्वांचे आभार मानले.

डाॕ. अ. ना. रसनकुटे कोकण प्रदेशाध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना खेडोपाडी मराठी साहित्य पोहचविणे ही आजच्या काळाची खरी गरज असे सांगितले.सद्य परिस्थितीत कोरोना महामारीने देशाला ग्रासले आहे. या संसर्गजन्य रोगामुळे विविध क्षेत्रामध्ये गेल्या दिड-दोन वर्षात अनेक बदल घडत असतांना मराठी साहित्य क्षेत्रामध्येही आॕनलाईन कविसंमेलनाच्या पध्दतीचा स्वीकार केला जात आहे म्हटले.
” शुन्यातून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तव्य म्हणजे त्यांनी सामान्य माणसाकडून असामान्य कार्य करून घेतले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य उभारले. त्यामुळे त्यांचे कार्यआणि कर्तुत्व सर्व जनतेला
प्रेरणादायी ठरलं. संपूर्ण कोकण
प्रदेशातील ग्रामिण भागातील खेडो-पाडी मराठी साहित्य पोहचविणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. असे म्हणाले.

प्रमुख पाहुणे डॉ.लक्ष्मण महामने सर, राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक यांनीही शिवरायांच्या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच पुणेरी एफ एम १०७.८ चे सुप्रसिद्ध रेडिओ जँकी कैलास नाईक सर यांनीही मार्गदर्शन केले.
फुलचंदजी नागटिळक, महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष, प्रा. सौ. शुभम पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष, सौ.मंजुषा गवई, पालघर जिल्हा उपाध्यक्षा, हिरकणी राजश्री बोहरा,मुंबई प्रदेशाध्यक्षा , सौ.सुवर्णा जाधव , मुंबई प्रदेश उपाध्यक्षा , सौ.अनिताताई गुजर, डोंबिवली प्रदेशाध्यक्षा, सौ.जयश्री नांदे,पुणे विभागीय सचिव , चंद्रकलाताई जोशी,सुप्रसिद्ध कवयित्री , सौ.संगीता लंघे,सुप्रसिद्ध कवयित्री , विजय कुमार मेश्राम, गोंदिया कोषाध्यक्ष, नवनाथ ठाकूर, डोंबिवली सरचिटणीस , अविनाश ठाकूर, डोंबिवली सहसचिव,
नवनाथ गायकर सर, नाशिक जिल्हाध्यक्ष आणि माणिकराव
गोडसे, नाशिक जिल्हाउपाध्यक्ष
सन्माननिय अतिथी म्हणून हजर
राहून त्यांनी उपस्थिता समोर आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर मंडणगड तालुका
अध्यक्ष संदिप तोडकर यांनी आपल्या कार्यकारीणीतील सर्व पदाधिका-यांचे तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ.अ.ना.रसनकुटे सर आणि डॉ. अलका नाईक, कोकणप्रदेश उपाध्यक्षा यांचे योग्य ते सहकार्य लाभल्यामुळे हे आॕनलाईन कविसंमेलन अधिक यशस्वी झाल्याचं सांगितले. पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.शुभम पाटील मँडम तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्षा सौ.मंजुषा गवई यांचे विशेष आभार मानले .त्यांच्या विनंतीस मान देऊन सौ.अनिताताई गुजर,डोंबिवली प्रदेशाध्यक्षा यांनी संमेलनामध्ये काव्यसादरीकरणाच्या सुरुवातीला “स्वराज्य तोरण चढे,गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे” हे गीतगायन करुन काव्यमैहफिल बहारदार केल्याबद्दल अनिताताई यांचेही विशेष आभार मानले आणि सर्वांना धन्यवाद दिले.

अनेक कवी/कवयित्री यांनी या काव्यसंमेलनात सहभागी होऊन आपल्या रचनांचे सादरीकरण करून उपस्थितांची वहावा मिळविली व संमेलनाला खरी रंगत आणली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.