आईच्या दिवस कार्यानिमित्त वाटली शेकडो झाडे
सिटी बेल | वसई |
वसई नायगाव येथील जूचंद्र गाव हे कलेचे माहेर घर म्हनून प्रसिध्द आहेच तसेच ते जुन्या नको असलेल्या रूढी बदलणे आणि नवा आधुनिक पायंडा पाडण्यासाठी देखील प्रसिध्द आहे. याचीच प्रचिती एका घटनेतून जूचंद्र गावात दिसून आली.

जूचंद्र गावचे रहिवाशी असलेले सुरेश हरेश्वर पाटील यांनी त्यांच्या आई कै. प्रतिभा हरेश्वर पाटील यांच्या दिवस कार्या निमित्त जमलेल्या नातेवाईकांना कोणतीही उंची मिठाई किंवा आठवण म्हणून एखादी वस्तू भेट न देता आईच्या स्मृती चिरकाल टीकावी म्हणून वेगवेगळ्या फूल फळाची झाडे भेट म्हनून दिली.
दरम्यान, त्यांच्या ह्या हटके पायंड्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.आईच्या स्मृतीतून पर्यावरणाचे जतन व्हावे आणि एक नवा पायंडा पडावा ह्या प्रामाणिक उद्देशाने ही झाडे वाटप केली असे सुरेश पाटील यांनी बोलताना संगितले.








Be First to Comment