जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा आरोग्य विभागावर स्मुतिसुमने
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यावर आल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौ्रोदगार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोहोप येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पाहणी दौऱ्यावेली बुधवार दि.23 रोजी काढले
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्व सुविधानी संपन्न असे प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्य संदर्भात मोठी अडचण दूर होणार असल्याने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या इमारतीला भेट दित पाहणी केली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांच्याशी पूर्ण इमारतीच्या कामाची पाहणी केली तसेच प्रत्येक खोलीत जाऊन माहिती घेत काही सूचनाही केल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विभागातील कोविड रुग्णांच्या बद्दल माहिती घेतली आणि आजच्या परिस्थितीचा आढावा घेताना लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, ग्रामपंचायतचे अधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या मेहनतीने आज या परिसरात कोविड पॉझिटिव्हीटी रेट खूप कमी झाला आहे भविष्यातही अशेच काम करीत रहा असे बोलत सध्या रायगड जिल्ह्याच्या जवळच कोविडचा प्रगत झालेला विषाणू आलेला आहे जरी कोविडचे रुग्ण कमी होताना दिसत असले तरी पुढे या प्रगत झालेल्या विषाणुमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनीही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी प्रांतअधिकारी वैशाली परदेसी, तहसीलदार इरेश चप्पलवार,पोलीस निरीक्षक सुजाता ताणावडे,सीएचओ डॉ अभिजित झूरे, भगवान निरगूडे, संदीप ठाकूर, भरत सोळंकी, प्रताप ढगे, जय पार्टे उपस्थित होते.
Be First to Comment