Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार जलवाहीनीची दुरूस्ती

21 व 22 जून 2021 रोजी कळंबोली, नवीन पनवेल (पू. व प.), करंजाडे आणि काळुंद्रे नोडमधील पाणी पुरवठा बंद

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |  

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून हाती घेण्यात येणार्‍या तातडीच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांमुळे, 21 जून 2021 रोजी सकाळी 09.00 ते 22 जून 2021 रोजी सकाळी 09.00 पर्यंत (एकूण 24 तास) घेण्यात येणार्‍या शटडाउनमुळे या कालावधीत कळंबोली, नवीन पनवेल (पू. व प.), करंजाडे आणि काळुंद्रे या नोडमधील पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच त्यानंतर पाणी पुरवठा सुरू होण्याच्या दिवशी तो कमी दाबाने होईल.

उपरोक्त नोडमधील रहिवाशांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे. त्याचप्रमाणे पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.