सामाजिक क्षेत्रात नेत्रदिपक कार्य करणाऱ्या जाणीव फौंडेशनच्या वतीने शिक्षण घेत असलेल्या एका होतकरू विद्यार्थिनींला सायकल भेट दिली.
उसर्ली येथे राहणाऱ्या श्वेता माने ही विद्यार्थीनींला सायकलची नितांत गरज असल्याची माहिती जाणीव फौंडेशनचे अध्यक्ष राजेश केणी यांना समजली.श्वेताची शिक्षण घेण्याची जिद्द पाहून जाणीव फौंडेशनने तिला तिच्या आवडीची सायकल भेट दिली.
या वेळी जाणीव फौंडेशनचे राजेश केणी, संदीप यादव,अनिल उलवेकर, संतोष यादव ,दिनेश भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.
सायकल भेट देणे ही काही मोठी गोष्ट नसली तरी एखाद्याला मदत केल्यानंतर मिळणारा आनंद नक्कीच लाख मोलाचा असल्याचे जाणीव फौंडेशनचे अध्यक्ष राजेश केणी यांनी सांगितले.या पूर्वीही जाणीव फौंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,अपघातग्रस्त लोकांना मदत,रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहिम, गरजू महिलांना व्यवसाय मदत, आदिवासी भागात कपडे वाटत, कोरोना काळात अन्नधान्य वाटप – हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था आदी कामे केल्याचे राजेश केणी यांनी सांगितले.








Be First to Comment