सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील साहेबांचेच नाव द्यावे यासाठी इथला भूमिपूत्र आग्रही आहे. ज्यांनी आम्हाला हे वैभव मिळवून दिले त्यांचेच नाव या विमानतळाला असावे अशी भूमिका येथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची आहे. मात्र सिडकोने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला तर मंत्रिमंडळात तो मान्य करुन घेतल्याने येथील भूमिपूत्र पेटून उठला आहे आणि आंदोलनाच्या तयारीत आहे. नेमका हाच धागा पकडून ‘दि.बा. पाटील साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ’ या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
दिशा इंटरटेंटमेंट अॅण्ड न्यूचे संपादक सुनील कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौस्तुभ कटेकर यांनी या गाण्याची निर्मिती केली असून सुप्रसिध्द गायक परमेश माळी यांनी त्यांच्या दमदार आवाजाने या गाण्याला रंगत आणली आहे. संतोष सुतार यांनी लिहिलेले हे गाणे साई एकविरा स्टुडिओचे अक्षय पाटील, सौरभ पाटील यांनी उत्कृष्टरित्या संगीतबध्द केले आहे. तर व्हिडिओमधील छायाचित्र ही अमन वास्कर यांनी कॅमेरात बंदिस्त केली आहेत. तर गाण्याचे संकलन कल्पेश दमडे व इशान ठाकूर यांनी केल आहे.








Be First to Comment