Press "Enter" to skip to content

रिक्षा चालक पंकज शर्मा देतात अपंग, आर्मी, रुग्णांना फ्री सेवा

नवी मुंबई, पनवेल परिसरात मोफत प्रवासासाठी अपंग, आर्मी व रुग्णांनी पंकज शर्मा यांच्या 7039539956 या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन.

सिटी बेल | कळंबोली | विठ्ठल ममताबादे |

कळंबोली येथील रहिवाशी पंकज रामशंकर शर्मा हे सर्वसामान्य रिक्षाचालक आहेत. परंतु त्यांचे कार्य हे समाजासाठी खूपच उपयोगी व प्रेरणादायी आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात अपंग, आर्मी, आणि दवाखान्यातील रुग्णांना कायस्वरूपी ते फ्री मध्ये सेवा देतात. अपंग, आर्मी आणि रुग्णांकडून ते प्रवासाचे कधीच पैसे घेत नाहीत. संपूर्ण नवी मुंबई मध्ये सेवा देणारे ते एकमेव रिक्षाचालक आहेत.

समाजाची ते रात्रंदिवस 24 तास सेवा करत असल्याने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून अनेक जणांनी सत्कार केला आहे.आजच्या धक्का धक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे.मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून पंकज शर्मा यांच्या समाजसेवी वृत्तीचा देखील जनतेने कौतुक केले आहे.

आर्मी लव्हर म्हणून परिचित असलेले पंकज शर्मा यांचे आर्मी मध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षा द्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला.तेंव्हापासून आजपर्यंत व पुढेही हा संकल्प चालू ठेवणार असल्याचे पंकज शर्मा यांनी सांगितले.अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्ण यांनी मोफत प्रवासासाठी पंकज शर्मा यांच्या
7039539956 या फोन नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.